Advertisement

रत्नागिरीतील बेपत्ता दाम्पत्याचा मृतदेह माथेरानच्या दरीत सापडला

माथेरान येथे फिरण्यासाठी गेलेल्या रत्नागिरीतील राजापूर येथील दाम्पत्याचा माथेरान येथे दरीत मृतदेह आढळून आला.

रत्नागिरीतील बेपत्ता दाम्पत्याचा मृतदेह माथेरानच्या दरीत सापडला
SHARES

माथेरान (Matheran) इथे फिरण्यासाठी गेलेल्या रत्नागिरीतील (Ratnagiri) राजापूर (Rajapur)मधील दाम्पत्याचा माथेरान दरीत मृतदेह आढळून आला. पार्थ काशिनाथ भोगटे (46) आणि त्यांची पत्नी श्रीलक्ष्मी पार्थ भोगटे (46, रा. राजापूर) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. ते 11 जुलै रोजी माथेरानला गेले होते.

संध्याकाळी फिरण्यासाठी जात असल्याचे सांगून हे जोडपे हॉटेल ब्राइट लँडमधून निघाले होते. दुसऱ्या दिवशी हे जोडपे परतले नसल्याचे हॉटेल अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांना कळवले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी या जोडप्याचे फोटो व्हॉट्सॲप ग्रुप्सवर शेअर केले. तसेच या जोडप्याबद्दल माहिती मिळाल्यास कळवा, असे आवाहनही केले. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे जोडपे शेवटचे इको पॉईंटकडे जाताना दिसले आणि या जोडप्याचे शेवटचे लोकेशन दरीजवळ सापडले. माथेरानची सह्याद्री रेस्क्यू टीम तेव्हापासून या दाम्पत्याचा माथेरान खोऱ्यात शोध घेत होती. 14 जुलै रोजी पार्थचा लहान भाऊ रुद्राक्ष काशिनाथ भोगटे (43) याने माथेरान गाठून माथेरान पोलिसांत हरवल्याची तक्रार नोंदवली.

सोमवारी, बचाव पथकाने अखेर या जोडप्याचे मृतदेह लुईसा पॉइंट येथील दरीत सापडले. रायगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे म्हणाले, “प्रथमता, आम्हाला असे आढळले आहे की हे जोडपे शेअर मार्केटमध्ये होते आणि त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.”

रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, “आम्ही पोस्टमॉर्टम अहवाल आणि इतर निष्कर्ष मिळेपर्यंत ही आत्महत्या आहे असा निष्कर्ष काढत नाही. आधी मृतदेह आणणे आवश्यक असून त्यानंतर पुढील तपास करण्यात येईल. ही आत्महत्या आहे का आणि त्याचे कारण काय असावे याचा तपास पोलीस करत आहेत.



हेही वाचा

दिल्ली आता दूर नाही! माथेरानच्या डोंगरातून निघणार बोगदा

पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा