Advertisement

मतदानासाठी 30 हजारांहून अधिक पोलिस तैनात

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी बुधवार 20 नोव्हेंबर रोजी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतदानासाठी 30  हजारांहून अधिक पोलिस तैनात
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या (vidhan sabha elections) पार्श्वभूमीवर मुंबईत (mumbai) ठिकठिकाणी आज (बुधवार) 20 नोव्हेंबर रोजी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 30 हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

तसेच साडेचार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून मुंबई पोलीस (mumbai police) दलाने पाच अपर पोलीस आयुक्त, 20 पोलीस उप आयुक्त, 83 सहायक पोलीस आयुक्त नेमले आहेत.

यांच्यासह दोन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व 25 हजारांहून अधिक पोलीस अंमलदार, 03 दंगल नियंत्रण पथके असा फौजफाटा बंदोबस्तासाठी (police protection) तैनात करण्यात आला आहे.

तसेच वाहतूक विभागामार्फत स्वतंत्रपणे 144 अधिकारी व एक हजाराहून अधिक पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत चार हजारांहून अधिक गृहरक्षक दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.

Advertisement

याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी 26 केंद्रीय सुरक्षा दले तसेच राज्य सुरक्षा दले यांची निवडणूक कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

मतदान केंद्रालगतच्या 100 मीटर परिसरात मोबाइल अथवा वायरलेस यंत्रणा, तसेच परिसरात बॅनर, ध्वनीक्षेपक, मेगोफोनचा वापर करण्यास बंदी आहे.

याशिवाय मतदान केंद्र, परिसरात मतदार व निवडणूक आयोगाचे अधिकारी वगळता इतर कोणतीही व्यक्ती घुटमळणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने (EC) दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल. त्याबाबत सर्व पोलिसांना सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा