मुंबईला (mumbai) पाणीपुरवठा (water supply) करणाऱ्या सात जलाशयांपैकी एक असलेल्या भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात 21 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणी गढूळ झाले आहे.
घरच्या नळाला गढूळ अथवा लालसर पाणी (muddy water) आल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे पालिका प्रशासनाने (bmc) नागरिकांना सांगितले आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये, विशेषतः पूर्व उपनगरांमध्ये गढूळ पाणीपुरवठ्याच्या अहवालानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) गढूळपणा कमी करण्यासाठी त्यांच्या जलशुद्धीकरण केंद्रांवर योग्य उपाययोजना करत आहे. मात्र, खबरदारी म्हणून नागरिकांना पिण्याचे पाणी फिल्टर करून अथवा उकळून पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महापालिकेचा हायड्रॉलिक अभियांत्रिकी विभाग पाण्यातील गाळ काढण्यावर प्रक्रिया करत आहे. तसेच पाण्यात क्लोरीनचा वापर जंतुनाशक म्हणून करत आहे. तथापि, अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून, नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांचे पिण्याचे पाणी फिल्टर करून अथवा उकळून प्यावे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार पालिका प्रशासन पाण्याच्या गुणवत्तेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच स्वच्छ पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
हेही वाचा