मुंबईतील (mumbai) प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने (bmc) काही मार्गदर्शक तत्त्वांची (guidlines) अंमलबजावणी केली होती. मात्र याचे पालन न करणाऱ्या 28 बांधकाम स्थळांना (construction) बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत.
नियमांचे पालन न केल्यास काम थांबवण्याची नोटीस बजावणे किंवा कामाची जागा सील करणे अशा कडक कारवाईचा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.
मुंबईतील वातावरणाची पातळी खालावत चालली आहे. तसेच वायू प्रदूषणातही (air pollution) वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वायू प्रदूषण आणि विशेषतः धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागात युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगरात वायुप्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होत आहे की नाही हे तपासण्यासाठी पथकांनी सर्व 24 प्रशासकीय विभागांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे.
बुधवारपासून महापालिकेच्या पथकाने 868 बांधकाम स्थळांना भेटी दिल्या आहेत. यातील नियमांचे पालन न करणाऱ्या एकूण 28 बांधकामांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील वायू प्रदूषण हे प्रामुख्याने बांधकामांमुळे होते. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी कोणते नियम पाळले जावेत, याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पालिकेने गेल्या वर्षीच जाहीर केली होती.
मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व संबंधित पक्षांनीही प्रयत्न करणे आवश्यक असल्याने महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नियमांच्या पूर्ततेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व 24 प्रशासकीय विभागात पथके नेमण्यात आली आहेत.
महापालिकेच्या पथकाने एका दिवसात मुंबईतील 868 बांधकाम प्रकल्प स्थळांना भेट दिली. यात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या 28 बांधकाम प्रकल्पांना लेखी नोटीस बजावण्यात आली आहे.
उर्वरित बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणांना भेटी देण्याचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. तसेच महापालिकेचे इतर संबंधित विभागही ‘ऑटो डीसीआर’ सारख्या ऑनलाइन प्रणालीद्वारे बांधकाम प्रकल्पांना लेखी सूचना देत आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा