सोमवारी 25 नोव्हेंबरच्या रात्री मुंबईत (mumbai) किमान तापमान 16 अंशांपर्यंत पोहोचले होते. गेल्या आठ वर्षांतील नोव्हेंबरचा हा सोमवारचा दिवस शहरातील सर्वात थंड (coldest) दिवस ठरला आहे.
याआधी, 2016 मध्ये सर्वात 11 नोव्हेंबर रोजी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती, जेव्हा किमान तापमान( lowest temperature) 16.3 अंशांवर घसरले होते.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या सांताक्रूझ वेधशाळेने 16.8 अंश सेल्सिअस नोंदवले, जे सामान्य तापमानापेक्षा सुमारे चार अंशाने कमी आहे. तर कुलाबा वेधशाळेने 22.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली.
सांताक्रूझ येथे 33.1 अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे 32 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
हवामान खात्याच्या (india meteorological department) अंदाजानुसार, शहरातील थंडीचा कडाका कायम राहील. किमान तापमान पुढील 3-4 दिवस 17 अंशापर्यंत नोंदवला जाईल.
हेही वाचा