कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून दिवसेंदिवस रूग्णांची संख्याही वाढतच आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. त्यांना रात्रंदिवस काम करावं लागत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने ११४ परिचर कक्ष म्हणजेच वॉर्ड बॉयची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांसाठीची जाहीरात पालिकेने प्रसिद्ध केली आहे.
इच्छुक उमेदवारांनी १७ एप्रिल २०२० पूर्वी पोस्ट किंवा ईमेल आयडीवर अर्ज पाठवण्याचं आवाहन पालिकेने केलं. वॉर्ड बॉय पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास आहे. त्यांना १८ ते ५७ हजार इतका पगारही मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना डाऊनलोड करायचा आहे. सर्व नियम आणि अटी वाचल्यानंतर अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF Format मध्ये अर्जासह mcgm.wardboy@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर पाठवायच्या आहेत.
ज्या उमेदवारंना ईमेल करणं शक्य नसल्यास पोस्टाने किंवा महापालिकेच्या मुख्यालयातील गेट क्रमांक ७ या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये १७ एप्रिल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाठवण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे.
उमेदवारांसाठी महत्वाचे
- शैक्षणिक पात्रता – दहावी पास
- वेतन – १८ ते ५७ हजार
- येथे पाठवा अर्ज – mcgm.wardboy@mcgm.gov.in
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – १७ एप्रिल २०२०
हेही वाचा -
जी दक्षिण विभागात २५० कोरोनाग्रस्त
मुंबईसहीत ८ जिल्हे रेड झोनमध्ये, पुढं काय होणार?