Advertisement

घाटकोपरमध्ये दुमजली इमारतीचा भाग कोसळला, बचावकार्य सुरू

ही घटना सकाळी 9.15 च्या सुमारास घडली

घाटकोपरमध्ये दुमजली इमारतीचा भाग कोसळला, बचावकार्य सुरू
SHARES

रविवारी सकाळी घाटकोपरमध्ये तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत दोन जण, एक वृद्ध महिला आणि एक पुरुष अडकले आहेत.

घाटकोपर पूर्वेकडील राजावाडी परिसरात रविवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास ही घटना घडली. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होते.

पालिकेने एएनआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "घाटकोपर (पूर्व) येथील राजावाडी कॉलनीमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला आहे. काही रहिवासी इमारतीत अडकले आहेत. बचाव कार्य सुरू आहे."

महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ANI ला सांगितले की, "4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे आणि 2 लोक अजूनही आत अडकले आहेत, बचाव कार्य सुरू आहे."



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा