रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात वाहतूक पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळवण्यात अडचणी येत असल्याचं पालिकेने म्हटले आहे. तसेच काँक्रिटीकरणाचे काम आता आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत लांबण्याची शक्यता असल्याचंही पालिकेचे म्हणणे आहे.
बीएमसीने ऑक्टोबर महिन्यात पावसाळ्यानंतरचे रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प पुन्हा सुरू केले. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सुमारे 324 किलोमीटर रस्त्यांचे 31 मे 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असलेल्या टप्प्यात 1 मध्ये काँक्रिटीकरण केले जाईल.
टप्पा 2 मधील 309 किलोमीटरच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची वर्क ऑर्डर गेल्या महिन्यात जारी करण्यात आली होती. मात्र, आवश्यक परवानग्या मिळविण्यात पालिकेला आव्हाने येत आहेत.
"खोदकामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिस गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना राबवत आहेत.
काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान भूमिगत पाइपलाइनचे नुकसान टाळण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी अलीकडेच वीज आणि गॅस पुरवठादारांशी चर्चा केली. तसेच, कोणतीही घटना टाळण्यासाठी इजिंनियर्स आणि रस्ते विभाग जवळून समन्वय साधत आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
बीएमसीने फेज 1 साठी 6,080 कोटीच्या करारासह काँक्रीटीकरण उपक्रम सुरू केला. आजपर्यंतचा सर्वात मोठा पालिका करार असल्याचं बोललं जातंय. तथापि, जानेवारी 2023 मध्ये प्रकल्प सुरू झाल्यापासून 10 जूनपर्यंत केवळ 30% काम पूर्ण झाले आहे.
सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पात पालिकेने भारतीय तंत्रज्ञान संस्था - बॉम्बे (IIT-B) ची मदत घेतली आहे. गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे.
हेही वाचा