Advertisement

अबब! 2,931 झाडे लावण्यासाठी12 कोटी खर्च

अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केला होता की सुधारित किंमत देखील खूप जास्त आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रत्येक झाडासाठी जे पैसे देते त्यापेक्षा ती 40 पट जास्त आहे.

अबब! 2,931 झाडे लावण्यासाठी12 कोटी खर्च
SHARES

मुंबई (mumbai) मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने 41 कोटी रुपये खर्च केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. 29 जुलै रोजी, फ्री प्रेस जर्नलने अधिवक्ता गॉडफ्रे पिमेंटा यांच्या आरटीआय प्रश्नावर एमएमआरसीएलच्या उत्तराचे वृत्त दिले होते.

सरकारी मालकीच्या कंपनीने मेट्रो 3 (metro 3) किंवा एक्वा लाइन (aqua line) च्या मार्गावर वृक्षारोपणासाठी 12.01 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला होता.

मात्र, या मार्गावर लावलेल्या झाडांची (trees) खरी संख्या आणि त्यांचे ठिकाण याचा तपशील देण्यास कंपनी अपयशी ठरली. 

यानंतर कंपनीने दावा केला की, सरासरी 2 लाख रुपये प्रति झाड या खर्चात केवळ 584 झाडेच लावली गेली. फ्री प्रेस जर्नलच्या अहवालानंतर, एमएमआरसीएलने दावा केला की, एकूण 2,931 झाडांसाठी 12.01 कोटी रुपये म्हणजे सरासरी 41,000 रु. प्रति झाड इतकी किंमत आहे.

तथापि, अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केला होता की सुधारित किंमत देखील खूप जास्त आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) प्रत्येक झाडासाठी जे पैसे देते त्यापेक्षा ती 40 पट जास्त आहे. 

आरटीआयच्या सांगण्यानुसार निविदांसाठी बोली लावलेल्या अंदाजे किंमतीपेक्षा हि रक्कम 31% इतकी कमी होती.

एजन्सींच्या कमी बोली खर्चावर चिंता व्यक्त करताना, पिमेंटा म्हणाले, “सामान्यतः कोणत्याही निविदांसाठी सरकारी प्राधिकरणाने ठरवलेल्या खर्चापेक्षा जास्त बोली लावली जाते.

परंतु येथे खर्चापेक्षा कमी किंमत दाखवली जात आहे ,जे आश्चर्यकारक आहे. जर कोणी खर्चापेक्षा कमी बोली लावत असेल तर वृक्षारोपण आणि देखभालीच्या दर्जात तडजोड होण्याची शक्यता आहे.”



हेही वाचा

ठाणे स्टेशनवर 8 मजली कमर्शिअल टॉवर उभारण्यात येणार

वांद्रे : स्विमिंग पूलसाठी 27 झाडांवर कुऱ्हाड

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा