पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. त्यातच आता विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी आयुक्तांनी अनोखी शक्कल लढवली आहे.
सतत हॉर्न वाजवणाऱ्यांना दंडाबरोबरच तीन तास पोलीस चौकीत बसवून वाहतूक नियमांचे धडे गिरवावे लागणार आहे. एवढ्यावरच न थांबता याकडे त्यांनी गांभीर्यानं ऐकलं की नाही यासाठी त्यांची परीक्षाही घेण्यात येणार आहे.
मुंबई पोलिसांकडून काही कपडे आणि वस्तू तयार करण्यात येणार आहेत. या वस्तूंची विक्री करून मिळणारे पैसे मुंबई पोलीस कल्याण निधीसाठी वापला जाईल, अशी माहिती आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांकडून टी शर्ट, टोपी, कप, स्वेटर, ट्रकसूट, परफ्यूम, पाणी बॉटल यासारख्या विविध वस्तू बनवण्यात येणार आहेत. मुंबई पोलिसांकडून बनवण्यात येणाऱ्या या वस्तू शोरूममध्ये विकल्या जातील. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे पैसे पोलिसांच्या कल्याण निधीसाठी वापरला जाईल, अशी माहिती संजय पांडे यांनी फेसबुकवरून संवाद साधताना दिली आहे.
त्यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये काही फोटो देखील आहेत. यात पाण्याच्या बाटल्या, परफ्यूम आणि मग यांचाही समावेश आहे. फोटोमध्ये असलेल्या या टोप्या पोलिसांच्या टोप्यांसारख्या नाहीत, असंही पांडे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून रविवारी मुंबईकरांसाठी 'संडेस्ट्रीट' सुरू करण्यात आले होते. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पुढाकारानं मुंबईत सहा ठिकाणी हे सँडेस्ट्रीट सुरू करण्यात आले आहेत.
हेही वाचा