Advertisement

लक्ष द्या! मुंबईतल्या 'या' भागात 30 तास पाणी पुरवठा बंद

पाहून घ्या तुमच्या भागात पाणी येणार की नाही?

लक्ष द्या! मुंबईतल्या 'या' भागात 30 तास पाणी पुरवठा बंद
SHARES

मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा. कारण पाणी पुरवठ्यासंदर्भात मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे.  5 ते 6 फेब्रुवारी दरम्यान भांडुप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादर भागातील लोकांना 30 तास पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. 

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पवई अँकर ब्लॉक आणि मारोशी वॉटर शाफ्ट दरम्यान 2400 मिमी व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. म्हणूनच 1800 मिमी व्यासाच्या तानसा पूर्व आणि पश्चिम पाइपलाइनचे अंशतः विघटन केले जाईल.

जेणेकरून 2400 मिमी व्यासाची नवीन पाइपलाइन सुरू केली जाणार आहे. हे काम 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 30 तास चालेल.

एस वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या श्रीराम पाडा, खिंडी पाडा, तुळशेत पाडा, मिलिंद नगर, शिवाजी नगर, भांडुप (पश्चिम), गौतम नगर, फिल्टर पाडा, महात्मा फुले नगर, सर्वोदय नगर आणि आसपासच्या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे गावदेवी पहाडी, टेंभी पाडा, एलबीएस रोड, सोनापूर जंक्शन ते मंगतराम पेट्रोल पंप, भांडुप (पश्चिम), शिंदे मैदानाजवळील परिसर, प्रताप नगर मार्ग, फुले नगर टेकडी, हनुमान टेकडी, अशोक टेकडी यासारख्या भागात पाणी पुरवठा बंद राहील.

एल वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या कुर्ला दक्षिणमध्ये, काजू पाडा, सुंदरबाग, नव पाडा, हलाव पूल, कपाडिया नगर, न्यू म्हाडा कॉलनी, पाईपलाईन रोड, एलबीएस मार्ग इत्यादी भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे कुर्ला उत्तर येथील 90 फूट रोड, कुर्ला-अंधेरी रोड, जरीमारी, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, साकी विहार रोड या ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील, याची नागरिकांनी नोंद घ्या.

जी उत्तर अंतर्गत येणाऱ्या धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, दिलीप कदम रोड, जास्मिन माईल रोड, माहिम गेट, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास रोड, 60 फूट रोड, 90 फूट रोड, धारावी लूप रोड या ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

के पूर्व वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या विजय नगर मरोळ, मिलिटरी रोड, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, ओमनगर, कांतीनगर, राजस्थान सोसायटी, सहारा गाव या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ, माहेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ आणि २, हनुमान नगर, शहीद भगतसिंग कॉलनी (भाग), पाणी विमानतळ रोड परिसर, सागबाग, मरोळ एमआयडीसी परिसरात पुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. 

तसेच एच पूर्व अंतर्गत येणाऱ्या वांद्रे टर्मिनस, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहराम पाडा, खेरनगर, निर्मल नगर इत्यादी भागात पाणीपुरवठा बंद राहील, याची नागरिकांनी नोंद घ्या. दुसऱ्या दिवशीची गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी बुधवार 5 फेब्रुवारीआधीच पाण्याचा साठा करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.



हेही वाचा

घनकचरा व्यवस्थापनासाठी मोजावे लागू शकतात पैसे

संजय गांधी उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा