सार्वजनिक ठिकाणी मास्क (Mask) न लावल्यास आता कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
मुंबईचे (Mumbai) पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विटरवर सांगितलं की, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) मास्कशिवाय दंड आकरणे थांबवले आहे. त्यामुळे शुक्रवार, १ एप्रिलपासून मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास नागरिकांना दंड आकारला जाणार नाही.
पालिकेनं स्पष्ट केलं की त्यांचे क्लीनअप मार्शल (Clean Up Marshal) शुक्रवारपासून मास्क न घातल्याबद्दल कोणालाही २०० रुपये दंड आकारणार नाहीत. मार्च २०२० मध्ये कोविड-19 साथीच्या आजारानंतर, प्रशासकिय प्राधिकरणानं सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले होते.
संजय पांडे यांच्या ट्विटमध्ये अनेक नागरिकांनी मास्कबाबत आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्यांनी ही बाब पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या निदर्शनास आणून दिली होती. पोलिस आयुक्तांनी पुढे सांगितले की, चहल यांनी त्वरित याची दखल घेतली आणि कुठल्याही प्रकारची कारवाई नागरिकांवर करू नये आसे आदेश दिले.
याशिवाय पालिकेनं ट्विटरवर नमूद केलं की, "२ वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या #BattleAgainstTheVirus ने आमच्याकडून खूप काही घेतले. तरीही या लढाईत सर्व स्तरातील लोक आमच्यासोबत आले. अनेकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. आम्ही आज हे ट्विट कररतोय की, उद्यापासून सर्व कोविड -19 निर्बंध उठवले जातील!"
This #BattleAgainstTheVirus that spanned for more than 2 years, took a lot from us.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 31, 2022
Yet people from all walks of life joined us in this battle.
The collective efforts of many have enabled us to tweet this today - all Covid-19 restrictions will be lifted starting tomorrow!
महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने गुरुवारी सर्व कोरोनाव्हायरस (Covid 19) निर्बंध मागे घेतले. शिवाय, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं की, मास्क घालणे आता ऐच्छिक आहे. तथापि, लोकांना गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी असताना मास्क वापरण्याचं आवाहन केलं.
याव्यतिरिक्त, सार्वजनिक वाहतूक तसंच मॉल्स, थिएटर, मुंबई लोकल (Mumbai Local) यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवास करण्यासाठी यापुढे पूर्णपणे लसीकरण करण्याची आवश्यकता नाही.
हेही वाचा