Advertisement

मुंबईचे डबेवाले राबवणार मतदान मोहीम


मुंबईचे डबेवाले राबवणार मतदान मोहीम
SHARES

मुंबई - मुंबईत मतांची टक्केवारी वाढावी आणि मतदारांमध्ये जागरूकता यावी यासाठी मुंबई महानगरपालिका विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन मुंबईचे डबेवाले " माझे मत माझी ताकद" ही मोहीम राबवणार आहेत. या मोहिमेअंतर्गत डबेवाले मुंबईकरांना" मतदान करा "असं आवाहन करणार आहेत. जेथे जेथे शक्य आहे तेथे तेथे आपल्या डब्यात" मतदान करा "असं आवाहन करणारी चिठ्ठी टाकून मुंबईकरांना मतदान करा असं आवाहन करणार आहेत.

ही मोहीम डबेवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे, उल्हास मुके, सोपान मरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार आहे. अशा मोहीमेमुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होईल आणि यातून मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल. म्हणून एका सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून १३ फेब्रुवारीपासून आठवडा भर ही मोहिम राबवण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा