Advertisement

सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस बंद, कारण...

मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार नाही आहे.

सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस बंद, कारण...
SHARES

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात  दर्शनासाठी भाविक परदेशातूनही येतात. महाआरतीलाही उपस्थित राहतात. मात्र, भाविकांना 5 दिवस सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येणार नाही आहे. 

प्रभादेवी स्थित सिद्धिविनायक मंदिरात बुधवार 11 डिसेंबर ते रविवार 15 डिसेंबर या कालावधीत, मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार नाही आहे. कारण या कालावधीत श्री सिद्धिविनायकाचे सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात मंदिरातील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद राहणार आहे.

परंतू, भाविकांना गाभाऱ्या बाहेरून श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन दिले जाईल. या काळात नित्य धार्मिक कार्यक्रम नेहमीच्या वेळेवर सुरू राहतील.

सिद्धिविनायक मंदिरात गाभाऱ्यात जाऊन 5 दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नाही आहे. दर्शन भाविकांसाठी 5 दिवस बंद राहणार आहे. या काळात सिंदूर लेपन हा विधी पार पडेल. त्यानंतर सोमवारी 16 डिसेंबरला गाभाऱ्यामध्ये स्थलशुद्धी प्रीत्यर्थ उदकशांत आणि प्रोक्षण विधी हा धार्मिक विधी पार पडेल. त्यानंतर श्रींची महापूजा नेवैद्य आणि आरती झाल्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुला होईल.

तसेच सिद्धिविनायकासोबतच श्रीमारूतीचे देखील सिंदूर लेपन करण्यात येते. यंदाही प्रतिवर्षाप्रमाणे हा विधी होणार आहे. त्यामुळे या कालावधीत श्रीमारूतीचे दर्शनही बंद राहील. दरम्यान, 16 डिसेंबरपासून श्री मारूतीवर संक्षिप्त चालन विधी करून पहाटे भाविकांना श्रीमारूतीचे दर्शन घेता येईल.



हेही वाचा

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा जानेवारी अखेर पूर्ण ?

नवी मुंबई : रस्ते, नाल्याशी संबंधित तक्रारी 'या' नंबरवर करा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा