नवी मुंबई (navi mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Navi Mumbai International Airport) बहुप्रतिक्षित उद्घाटनाचे टेक-ऑफ आणि लँडिंग 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुपारी 3 ते 4 दरम्यान हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सध्या बांधकाम सुरू आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत ते पूर्णत: कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्राचे (maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बुधवारी, 9 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुखोई फायटर जेट उड्डाण करणार असल्याची घोषणा केली होती. नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले होते.
तसेच नव्याने बांधलेल्या हवाई धावपट्टीच्या ट्रायल रनसाठी गांधीनगर येथून सी- 295 संरक्षण वाहतूक विमान आणि पुण्याहून सुखोई एमके-30 लढाऊ विमान आणले जाणार आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) विमानतळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (ILS) चाचणी पूर्ण केल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर हा उद्घाटन सोहळा होत आहे.
सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 ऑक्टोबरला होणाऱ्या दौऱ्याच्या अनुषंगाने उद्घाटन होणार होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले.
हेही वाचा