Advertisement

नवी मुंबईतील ई-टॉयलेट बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय

सततच्या समस्या आणि होणाऱ्या गैरवापरामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील ई-टॉयलेट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईतील ई-टॉयलेट बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय
SHARES

नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) संपूर्ण शहरातील इलेक्ट्रॉनिक शौचालये (E-TOILET) टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2015 मध्ये या शौचालयांचे उद्घाटन करण्यात आले होते. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांद्वारे या शौचालयांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या ई-टॉयलेटना (E-TOILET) अनेक आव्हानांना आणि सुरक्षेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सुरुवातीला इको-फ्रेंडली (Eco-Friendly) टॉयलेटच्या वैशिष्ट्यांमुळे त्याचे कौतुक झाले. मात्र आता या ई-टॉयलेट्स (E-TOILET) मध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय, कॉईन-ऑपरेटेड बॉक्समधून पैसे चोरी केल्याच्या घटना आणि शौचालयांचा वापर बेकायदेशीर कृत्यांसाठी केला गेल्याचंही समोर आलं आहे.

सचिन अडसूळ (Sachin Adsul) या सामाजिक कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार, “ई-टॉयलेट (E-TOILET) वापरणाऱ्यांनी अनेक समस्या नोंदवल्या आहेत. यामध्ये नाणे टाकल्यानंतर दरवाजा उघडता न आल्याने काही व्यक्ती आत अडकल्याच्या घटनाही घडल्या आहेत.”

नवी मुंबई महानगरपालिकेचे (NMMC) अतिरिक्त महापालिका आयुक्त सुनील पवार (Sunil Pawar) यांनी पारंपारिक, सुस्थितीत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांकडे जाण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर भर दिला.

पवार म्हणाले, “आम्हाला शहरातील मोक्याच्या ठिकाणी पारंपारिक शौचालये विकसित करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी CSR निधीसह मदत करण्यास इच्छुक असलेल्या सामाजिक संस्थांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.”



हेही वाचा

नवी मुंबई: उत्पादन घटल्याने घाऊक बाजारात तांदळाच्या किमतीत वाढ

नवी मुंबईत आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा