Advertisement

नवी मुंबईकरांसाठी पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर

वेळापत्रक पाहण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी

नवी मुंबईकरांसाठी पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर
SHARES

यंदा पावसाला सुरुवात झाली असली तरी अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण परिसरातही यंदाच्या पावसाळ्यात केवळ 99 मिमी पाऊस झाला असून सध्याची धरण पातळी 68.95 मीटर आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आठवड्यातून काही दिवस सकाळी तर काही दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

सातपैकी चार दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी विभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पावसाची स्थिती लक्षात घेऊन नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

अपुऱ्या पावसामुळे मोरबे धरणातील पाण्याचा समतोल लक्षात घेऊन आठवड्यातून तीन दिवस सकाळी सात दिवस नियमित आणि संध्याकाळी फक्त पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आठवड्यातील चार दिवस दोन्ही वेळेस आणि तीन दिवस फक्त एकदाच पाणी पुरवठा केला जाईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

ठिकाण

आठवड्यातून दोन्ही वेळी (सकाळी आणि संध्याकाळ) पाणीपुरवठा

आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा (सकाळी)

बेलापूर

मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार

सोमवार, बुधवार, शुक्रवार

नेरुळ

सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार

मंगळवार, गुरुवार, शनिवार

वाशी

मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार

सोमवार, बुधवार, शुक्रवार

तुर्भे

सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार

मंगळवार, गुरुवार, रविवार

कोपरखैरणे

सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार

मंगळवार, गुरुवार, शनिवार

घणसोली

सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार

बुधवार, शुक्रवार, रविवार

ऐरोली

सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, रविवार

मंगळवार, शुक्रवार

खारघर, कामोठे

मंगळवार, बुधवार, शुक्रवार, रविवार

सोमवार, गुरुवार, शनिवार



हेही वाचा

अंबरनाथकरांना 1 दिवस, बदलापूरमध्ये 2 दिवसाआड पाणीपुरवठा

नवी मुंबईतील ई-टॉयलेट बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा