नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) आज 10 एप्रिल ते 11 एप्रिल या कालावधीत पनवेल महानगरपालिकेच्या (PMC) अंतर्गत येणाऱ्या खारघर आणि कामोठेसह त्यांच्या कार्यक्षेत्रात 24 तास पाणीकपात जाहीर केली आहे.
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा या मुख्य पाइपलाइनच्या देखभालीसह विविध दुरुस्तीच्या कामांसाठी पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
एका अधिकृत निवेदनात, पालिकेने म्हटले, “म्हणून, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र 10 एप्रिल सकाळी 10.00 ते 11 एप्रिल, सकाळी 10.00 पर्यंत बंद असेल. त्यामुळे सोमवार, 10 एप्रिल संध्याकाळ ते मंगळवार सकाळी 11 वाजेपर्यंत एनएमएमसी क्षेत्रातील तसेच कामोठे आणि खारघरमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शिवाय, मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.”
याशिवाय कर्जत-पनवेल रेल्वे मार्गासाठी चिखले येथील मोरबे मुख्य पाईपलाईनचे स्थलांतर आणि कळंबोली येथील द्रुतगती पुलाखालील दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील पाणीपुरवठा मेनलाइनचे कामही होणार आहे.
या अनुषंगाने, NMMC, कामोठे, आणि खारघर भागतील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचे जतन आणि जपून वापर करून NMMC ला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा