Advertisement

जानेवारीमध्ये विनातिकीट प्रवाशांकडून 5 कोटीहून जास्त दंड वसूल

पश्चिम रेल्वेने एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या काळात अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या, ज्यामुळे 117.54 कोटी रुपये वसूल झाले.

जानेवारीमध्ये विनातिकीट प्रवाशांकडून 5 कोटीहून जास्त दंड वसूल
SHARES

पश्चिम रेल्वेवरील (western railway) तिकिट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास मिळावा यासाठी, मुंबई (mumbai) उपनगरीय लोकल सेवा (mumbai local), मेल/एक्सप्रेस तसेच प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये सतत तिकीट तपासणी मोहिमा राबविल्या जात आहेत. जेणेकरून तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना आळा बसेल.

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अत्यंत प्रेरित तिकीट तपासणी (ticket chekcing) पथकाने एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या काळात अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जातात. ज्यामुळे 117.54 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातील 38.10 कोटी रुपये देखील समाविष्ट आहेत.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रेस विज्ञप्तीनुसार, जानेवारी 2025 या महिन्यात 2.24 लाख तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना शोधून 13.08 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

ज्यामध्ये बुक न केलेल्या सामानाच्या केसेसचा समावेश आहे. तसेच, जानेवारी महिन्यात, पश्चिम रेल्वेने (WR) मुंबई उपनगरीय विभागात 98,000 प्रकरणे शोधून 4.13 कोटी रुपयांचा दंड वसूल केला.

शिवाय, एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जातात. या मोहिमांमुळे एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत जवळजवळ 52,000 अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे.

तसेच 172 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने सर्वसामान्यांना योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.



हेही वाचा

राज्यात उन्हाळ्याच्या झळा सुरू

फूटपाथच्या कामात दुकानदारांचा खोडा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा