मध्य रेल्वेने (CR) परळ येथे नवीन लांब पल्ल्याच्या ट्रेन (long distance train) टर्मिनलसाठी सविस्तर योजना आखली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील ताण कमी करणे आणि उपनगरीय रेल्वे सेवा वाढवणे हे यामागचे उद्दिष्ट असेल.
हा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे अहवालात म्हटले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या (express train) जेव्हा परळहून सुटतील तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर कमी दाब असेल, ज्यामुळे एकूण सेवेची क्षमता सुधारेल.
यापूर्वी 2016 मध्ये मुंबई विभागाने परळ येथे अशाच प्रकारच्या टर्मिनलचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या वित्त विभागाला दिला होता. मात्र, मध्य रेल्वे कामगार संघटनेच्या विरोधामुळे हा प्रकल्प पुढे जाण्यापासून रोखला गेला.
परळ (parel) टर्मिनल प्रकल्पासोबतच, मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) चा विस्तार करण्याचीही योजना करत आहे. सध्या, LTT चे सात प्लॅटफॉर्म आहेत आणि ते दररोज 70,000 प्रवाशांना सेवा देतात. या योजनेत ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणखी चार प्लॅटफॉर्म जोडण्यात येतील.
यामुळे प्रवाशांच्या वाढत्या संख्या नियंत्रणात आणण्यात मदत होईल. सध्या, 26 लांब पल्ल्याच्या गाड्या दररोज LTT हून सुटतात. अधिक प्लॅटफॉर्म जोडल्याने वाहतूक सुलभ होईल आणि रेल्वे सेवेची क्षमता वाढवता येईल.
मध्य रेल्वे (central railway) कल्याण यार्डातील नूतनीकरणाला गती देत आहे. अधिक गाड्यांसाठी आणि ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी स्टेशनची क्षमता वाढवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, 24 डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी CSMT येथील दोन प्लॅटफॉर्म नोव्हेंबरपर्यंत वाढवले जाणार आहे.
हेही वाचा