जंगलतोड आणि झाडांची मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कत्तलीमुळे वन्यजीव शहरी वस्त्यांकडे वळत आहेत. याचीच प्रचिती वांद्र्यात पाहायला मिळाली. वांद्र्यातल्या कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तब्बल ७ फुटांचा अजगर आढळून आला. दरम्यान रस्त्यावरून जात असलेल्या काहींनी अजगरला बघितल्यानंतर तातडीने कंट्रोल रुमला संपर्क करत याची माहिती दिली. काहीवेळानंतर तिथे आलेल्या सर्प मित्रांनी ७ फुटांच्या अजगरला रेस्क्यू केला.
'सध्या बीकेसीतील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या साप आणि अजगर आढळण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे', अशी माहिती सर्पमित्र अतूल कांबळे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे.
मेट्रो ३ प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात खारफुटीच्या झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे सध्या मानव वस्तीत साप येतात. बीकेसी शेजारी धारावी मिठी नदी आहे. तिथून हे साप गटारात येतात. आणि मग मानवी वस्तीत शिरतात. हा अजगर बिनविषारी असून ७.५൦ फूट लांबीचा आहे.
अतुल कांबळे, सर्पमित्र