Advertisement

रेल्वे पोलिसाला लोकलसमोर ढकलले

वाशी रेल्वे पोलिसांकडून दोघा मारेकऱ्यांचा शोध सुरू

रेल्वे पोलिसाला लोकलसमोर ढकलले
SHARES

पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस हवालदाराची हत्या करण्यात आली. रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे घडली. या प्रकरणातील दोघा मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.

घणसोली इथे राहणारे वरिष्ठ पोलिस हवालदार विजय चव्हाण पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी पहाटे 5.30च्या सुमारास दोघांनी विजय चव्हाण यांना रबाळे ते घणसोली स्थानकादरम्यान ठाण्याहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकलसमोर ढकलले.

याबाबतची माहिती लोकलच्या मोटरमनने आरपीएफ आणि वाशी रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी विजय चव्हाण यांचा गळा दाबल्याच्या खुणा आढळून आल्या, तसेच शवविच्छेदन अहवालातही स्पष्ट झाले आहे.

विजय चव्हाण यांची गळा दाबून हत्या केल्यानंतर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे भासवण्यासाठी धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली असून, मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.



हेही वाचा

मराठी विरुद्ध भोजपुरी गाण्यांवरून वाद, एकाची हत्या

मुंबई : शिवाजी पार्कमध्ये एका व्यक्तीची हत्या

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा