पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनानं माहीम स्थानकातील ओव्हरहेड पाइपलाइन हटवून दुसऱ्या ठिकाणी बसविण्यासाठी सांगितलं आहे. एका संयुक्त बैठकीमध्ये पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिम यार्ड पुन्हा बनविण्यासाठी या ओव्हरहेड पाइपलाइनचा अडथळा येत असल्याचं सांगितलं. ही पाइपलाइन महीमहून धारावीपर्यंत पसरली आहे. त्याचप्रमाणं ही पाइपलाइन गंजली असून ती खूपच जूनी झाली असल्यानं प्रवाशांसाठी धोकादायक आहे.
रेल्वेच्या आधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार पालिकेनं ही पाइपलाइन लवकरात लवकर हटविण्याचं आश्वासन रेल्वे प्रशासनाला दिलं आहे. त्याचप्रमाणं या कामाला सुरूवात देखील झाली असून, पालिका ही पाइपलाइन जमिनीखालून नेण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे.
पावासाळ्यासाठी पालिका आणि रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहेत. रेल्वे स्थानकांदरम्यान पावसाचे पाणी साचू नये, यासाठी विविध सुविधा तैनात करण्यात आल्या आहेत. तसंच, रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांच्या दुरूस्तीची काम सुरू असल्यामुळं कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी रेल्वे पोलीसही देखील तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा -
रेल्वेच्या एका तिकीटीवर करता येणार तिन्ही मार्गावर प्रवास
राणीबागेच्या विकासासाठी २०० कोटी रुपये