महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (avinash jadhav) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण राज त्यांनी काही तासांतच राजिनामा मागे घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या खराब कामगिरीची जबाबदारी आपल्यावर घेत त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
याबाबत सविस्तर राजीनाम्याचे पत्र अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंना (raj thackeray) दिले होते. मात्र राज ठाकरेंनी राजीनाम्याचा स्विकार केला नसल्याचे अविनाश जाधव म्हणाले आहेत.
अविनाश जाधव यांनी मनसेच्या ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ठाणे (thane) आणि पालघर (palghar) जिल्ह्यात मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. या पराभवाचं खापर स्वत:वर घेत अविनाश जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यावर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची भेट घेतली.
ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी तुझीच आहे आणि तूच याठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायचे असे राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांना सांगितले.
आत्तापर्यंत राज ठाकरे यांनी जे आदेश दिले त्याचे मी पालन केले आहे. तसेच यापुढेही त्यांनी दिलेल्या आदेशाचे मी पालन करणार आहे अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.
राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेचे सामर्थ्य वाढवण्यात नव्याने प्रयत्न करणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा