Advertisement

मुंबई महापालिकेत विविध पदांसाठी भरती, वेतन १ लाख

मुंबई महापालिकेमध्ये विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली.

मुंबई महापालिकेत विविध पदांसाठी भरती, वेतन १ लाख
SHARES

मुंबई महापालिकेमध्ये (Mumbai Municipal Corporation) विविध पदांच्या १५ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment) सुरू झाली. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदासांठी  मुलाखती दिनांक ८, ९ व १० जून २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता होणार आहेत. 

पदाचे नाव आणि जागा :

१) सूक्ष्मजीव शास्त्र विभाग – ३
२) स्त्रीरोग शास्त्र विभाग- ४
३) व्यवसायोपचार विभाग- १
४) नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभाग -२
५) अस्थिव्यंग शास्त्र विभाग – ३
६) बालरोग चिकित्सा शास्त्र विभाग – २

शैक्षणिक अर्हता -

उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणं आवश्यक आहे. शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम. एस. सी. आय. टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण इत्यादीच्या प्रमाणित प्रतीलिपी अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे.

अनुभव -
मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.

सदर नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर एकावेळी चार महिन्यापेक्षा जास्त नाही. इतक्या कालावधीकरीता, प्रत्येक चार महिन्यानंतर एक दिवस सेवाखंड देऊन पुर्ननेमणूक अथवा महानगरपालिका वैद्यकीय निवड मंडळामार्फत (M.M.S.S.Board) अर्हताधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत यापैकी जे अगोदर होईल अशा स्वरुपात करण्यांत येईल. वयाची अट:- सर्वसाधारण उमेदवाराकरीता वय १८ वर्षांपेक्षा कमी व ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे व मागासवर्गीयांकरीता ४३ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

वेतनश्रेणी:-
उमेदवाराचे ठोक मासिक वेतन रुपये १,००,००० /- (एक लाख रूपये) असे असेल. सदर नियुक्ती निव्वळ कंत्राटी तत्त्वावर असल्यामुळे नियुक्त करण्यात येणा-या उमेदवारांना निवृत्तीवेतन योजना व भविष्यनिर्वाह निधी योजना लागू होणार नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीनंतर मुंबई महानगरपालिका (सेवा) नियम १९८९ व मुंबई महानगरपालिका सेवा (वर्तणूक) नियम १९९९ लागू होणार नाही.

१. जे उमेदवार म.न.पा. सेवेत असतील त्यांनी अर्ज भरण्याकरीता त्यांच्या खातेप्रमुखांची ना हरकत प्राप्त करावी

२. उमेदवाराने अर्जावर पासपोर्ट आकाराचा फ़ोटो लावावा व त्यावर त्यांनी उपलब्ध जागेत स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

३. उमेदवाराने अर्जावर भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी नमूद करावा.

४. उमेदवारांनी सूचना परिपत्रकात नमुद केलेल्या दिनी व वेळेत मुलाखातीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.

५. उमेदवारांनी सध्या ते कार्यरत असलेल्या संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

६. उमेदवारांनी त्यांच्या अर्जात (MMC / MCI) चा नोंदणी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

७. उमेदवारांनी मुख्य लिपिक (रोख) यांचे कडून दिनांक ३१.०५.२०२१ पासून दिनांक ०४.०६.२०२१

कार्यालयीन वेळेत अर्ज प्राप्त करता येईल.

शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग – २००/- रुपये]

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखत दिनांक : ८, ९ व १० जून २०२१ रोजी (पदांनुसार)

मुलाखतीचे ठिकाण : लो.टि.म.स रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई – ४०००२२.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा



हेही वाचा - 

मुंबईच्या चौपाट्यांवर पोलिसांची आता ‘एटीव्ही’वरून गस्त

मुंबई उपनगरातील नागरिकांना दिलासा, गोरेगावमध्ये 'इथं' नवं ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा