जिओ युझर्स आता व्हॉट्सअॅपच्या (Whatsapp) मदतीनं आपला मोबाईल क्रमांक रिचार्ज (Mobile recharge through Whatsapp) करू शकणार आहेत. तसंच युझर्सला आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर कोविड लस (Covid Vaccine) उपलब्ध आहे किंवा नाही याबाबतची माहिती मिळणार आहे.
जिओनं ही सुविधा व्हॉटसअप चॅटबोटच्या (Chatbot) माध्यमातून सुरू केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता जिओ युझर्स व्हॉटसअपच्या मदतीनं बिल भरणा, समस्यांचे निराकरण आणि तक्रार नोंदवण्यासह चॅटबॉटवर अन्य सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहे.
जिओनं आपल्या ग्राहकांसाठी व्हॉटसअॅपच्या मदतीनं सेवा पुरवण्यासाठी एक नवी सुविधा (Service) सुरू केली आहे. ही सुविधा ७०००७७०००७ या क्रमांकावर उपलब्ध होईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युझरला या क्रमांकावर केवळ Hi असा मेसेज पाठवावा लागणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून युझर आपल्या परिसरात कोविड लस उपलब्ध आहे का नाही? याबाबत माहिती मिळवू शकणार आहे.
कोविड-19 लशीच्या उपलब्धतेची माहिती युझर्स विना वनटाईम पासवर्ड चॅटबोटच्या माध्यमातून घेऊ शकणार आहेत. जिओचे हे व्हॉटसअ्ॅप चॅटबोट अन्य मोबाईल नेटवर्कसाठी देखील काम करत आहे. याच्या मदतीनं युझर्स लस उपलब्धतेच्या माहितीसह जिओ अकाऊंट देखील रिचार्ज (Recharge) करू शकणार आहेत.
रिलायन्स जिओची ही नवी सेवा जिओ केअर व्हॉटसअप चॅटबोटच्या माध्यमातून युझर्सनं आपला पिनकोड (Pincode) पोस्ट करावा. आपल्या परिसराचा पिनकोड टाईप केल्यानंतर लसीकरण केंद्र (Vaccination Center) आणि लस उपलब्धता रिफ्रेश करून लशीबाबतची संपूर्ण माहिती घेऊ शकतात.
जिओ युझर्स आता व्हॉटसअपच्या माध्यमातून मोबाईल पोर्टेबिलिटी सर्व्हिस, जिओ सिम, जिओ फायबर इंटरनेट, जिओ मार्ट आणि आंतरराष्ट्रीय रोमिंगचा सपोर्ट देखील मिळवू शकता. जिओ व्यतिरिक्त अन्य नेटवर्कवरून किंवा रजिस्ट्रेशन न केलेल्या क्रमांकावरून चॅटबोट एक्सेस करताना अकाऊंटशी संबधित माहिती देण्यापूर्वी युझर्सची पडताळणी केली जाते.
जिओनं या नव्या सेवेत भाषा बदलण्याचा पर्याय देखील दिला आहे. जर तुम्ही चॅटबोटची भाषा बदलू इच्छित असाल तर चेंज चॅट लॅग्वेज (Change Chat Language) या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्या गरजेनुसार हिंदी किंवा इंग्रजी भाषेची निवड करा.
हेही वाचा