Advertisement

चेंबूरमधील साई हॉस्पिटल सील

मुंबईतील चेंबूर परिसरातील साई हॉस्पिटलमध्ये आईसह 3 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.

चेंबूरमधील साई हॉस्पिटल सील
SHARES
मुंबईतील चेंबूर परिसरातील साई हॉस्पिटलमध्ये आईसह 3 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्ती रुग्णालयातील रुग्णांच्या संपर्कात आल्याने ही लागण झाल्याचं समजतं. त्यामुळे साई हॉस्पिटलला तातडीनं सील करण्यात आलं आहे. 


याप्रकरणी त्या महिलेच्या पतीनं आपल्या पत्नीसह बाळाला कोरोनाग्रस्तांसाठी नव्यानं रिकाम्या करण्यात आलेल्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्यानं त्यांना करोनाची लागण झाल्याचा आरोप केला आहे. २९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता आपल्या पत्नीची प्रसुती झाली. त्यानंतर माझ्या पत्नीला आणि तान्ह्या बाळाला दुपारी १२.३० च्या सुमारास एका वैयक्तीक खोलीत हलवण्यात आलं. परंतु दुपारी २ च्या सुमारास एका परिचारिकेनं आम्हाला पुन्हा दुसरीकडे जाण्यास सांगितलं. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आपल्या पत्नीमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती, असं महिलेच्या पतीने म्हटलं आहे. 

ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनानं तातडीनं पाऊल टाकत गुरुवारी साई हॉस्पिटलला सील केलं आहे.  या घटनेमुळे सैफी हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, भाभा हॉस्पिटल आणि हिंदुजा हॉस्पिटलवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.



हेही वाचा -

धक्कादायक!.. आईसह ३ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण

पीएनबी बनली देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोेठी बँक

कोरोनामुळं पश्चिम रेल्वेला २०७ कोटींचा फटका

गरजूंसाठी सौरव गांगुलीनं दिले २ हजार किलो तांदूळ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा