Advertisement

सदा सरवणकर माहीमच्या रिंगणात कायम

राज ठाकरेंची भेट न झाल्याने आपण निवडणूक लढवणार असल्याचं सरवणकर यांनी सांगितलं.

सदा सरवणकर माहीमच्या रिंगणात कायम
SHARES

विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याची आज (सोमवार) शेवटची तारीख आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती.  माहीम (mahim) विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकरसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या ठाकरेंना महायुतीमधील पक्ष पाठिंबा देतील अशी चर्चा होती. मात्र अनेक बैठका आणि चर्चांनंतर अखेर शेवटच्या काही मिनिटांपर्यंत सरवणकर तिकीट मागे घेणार की नाही? याबाबत मोठा सस्पेन्स होता. अखेर सदा सरवणकर (sada sarvankar) यांनी आता विषय संपला म्हणत निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे.

माझा मुलगा समाधान आणि कुणाल वाडेकर, अशोक संदीप देवळेकर हे माझे प्रमुख पदाधिकारी राज ठाकरेंना (raj thackeray) भेटायला गेले होते. आम्ही राज ठाकरेंचा सन्मान करतो, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला सांगितला होता. पण राज ठाकरेंनी भेट नाकारली आणि जर निवडणुकीला उभं राहायचं असेल तर उभे राहा असंही सांगितले. त्यामुळे मला वाटतं आता विषय संपलेला आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे.

राज ठाकरे मला भेटत नसतील तर मी काय करणार? मला उभं राहवच लागणार, मी महायुतीचा उमेदवार असून सर्व नेते मला पाठिंबा देतील. मुख्यमंत्र्यांच्या मनातही हेच होतं की राज ठाकरेंशी भेटून जो काय तो निर्णय घ्यावा, पण त्यांनी आमची भेटच नाकारल्याने आता मी तरी काय करणार, असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.

आम्ही राज ठाकरेंना भेटायला गेलो पण त्यांनी टाळलं. मुख्यमंत्र्यांनी समजूतदरापणाची भूमिका घेतली होती म्हणून आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. राज ठाकरे दिलखुलास नेते म्हणून त्यांची ओळख पण आज ते वेगळ्या मनस्थितीत होते. ते नाही भेटले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कायम आदर असणार आहे, असं समाधान सरवणकर यांनी सांगितलं.

माहीम मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. सरवणकर यांच्या उमेदवारीबाबत शेवटपर्यंत सस्पेन्स राहिल्याचं पाहायला मिळाला होता. आता अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्याने माहीममध्ये विजयाचा गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा

मागाठाणे आगारात बेस्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलन

भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टींची माघार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा