Advertisement

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मुंबईहून कोकणात विशेष ट्रेन

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मुंबईहून कोकणात विशेष ट्रेन
SHARES

उन्हाळी सुट्ट्यानिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे नियमित प्रवाशांसह इतर प्रवाशांची गर्दी वाढते. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे (konkan railway)  मार्गावर उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

सीएसएमटी- करमाळी- सीएसएमटी विशेष (साप्ताहिक)

मध्य (central railway) आणि कोकण रेल्वे मार्गावरून गाडी क्रमांक 01151/ 01152 सीएसएमटी (csmt)- करमाळी- सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी (special trains) धावणार आहे.

गाडी क्रमांक 01151 सीएसएमटी ते करमाळी विशेष (साप्ताहिक) 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर गुरुवारी सीएसएमटीहून रात्री 12.20 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता करमाळी येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 01152 करमाळी ते सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर गुरुवारी करमाळीवरून दुपारी 1:15 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री 3.45 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकावर थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण 22 डबे असतील.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा