Advertisement

वांद्रे-वर्सोवा सीलिंकसाठी करावी लागणार 4 वर्षांची प्रतिक्षा

वांद्रे ते वर्सोवा दरम्यान होणाऱ्या सी लिंकमुळे दीड तासांचा प्रवास 20 मिनिटांवर येणार आहे.

वांद्रे-वर्सोवा सीलिंकसाठी करावी लागणार 4 वर्षांची प्रतिक्षा
Representative Image
SHARES

वांद्रे ते वर्सोवादरम्यान तयार होत असलेल्या सीलिंकसाठी नवी डेडलाइन समोर आली आहे. 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणारा हा सीलिंक आता 2028 पर्यंत तयार होणार आहे.

17 किमी लांबीच्या या सीलिंकसाठी ठेकेदाराने नवी डेडलाइन दिली आहे. 2018पासून मुंबईच्या या दुसऱ्या सीलिंकचे काम सुरू आहे. सुरुवातीला प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू होत होते. त्यामुळं 2022 पर्यंत सीलिंकचे काम फक्त 2.5 टक्क्यांपर्यंतच होऊ शकले. त्यानंतर मात्र प्रकल्पाचे बांधकाम दुसऱ्या कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. 

2022 च्या अखेरीस पुलाचे बांधकाम फक्त 2.5 टक्क्यांपर्यंतच होऊ शकले होते. मात्र आता पुलाचे काम 17 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. पुलासाठी समुद्रात खांब उभारण्यात आले आहेत.

तर, काम झपाट्याने पूर्ण करण्यासाठी बांधकामाचे साहित्य पोहोचवण्यासाठी फ्लोटिंग फॅक्ट्री, मिक्सिंग प्लांट आणि पंपाचा वापर करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला काम उशिराने सुरू झाल्याने प्रशासनाला डेडलाइन  दोन वर्षांनी वाढवावी लागली आहे. 

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन सी लिंकवर चार कनेक्टर असणार आहेत. वांद्रे, कार्टर रोडस जूहू आणि वर्सोवा असे कनेक्टर असणार आहे. मुंबईतील हा दुसरा सीलिंक वांद्रे-वरळी सीलिंकला कनेक्ट करण्यात येणार आहे. तर, पुढील प्रस्तावीत वर्सोवा -सीलिंकदेखील या नव्या सीलिंकला जोडण्यात येणार आहे.

समुद्रावर बांधण्यात येणाऱ्या या पुलामुळं वांद्रे ते वर्सोवा अंतर फक्त 20 ते 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी दीड के दोन तासांचा वेळ लागतो. मात्र, या पुलामुळं अंतर निम्म्यावर येणार आहे. तर, हे तिन्ही सीलिंक पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची शक्यता आहे. 

वांद्रे वर्सोवा हा सागरी सेतू अंधेरीतील वर्सोवा येथे सुरू होणार असून तो कार्टर रोड जुहू मार्गे वांद्रेपर्यंत पोहोचणार आहे. तिथून हा पूल वांद्रे ते वरळी या सी लिंकला जोडला जाणार आहे. हा पूल 17.17 किमी इतका असणार आहे.

वांद्रे, वर्सोवा आणि वरळी परिसरात दररोज 4-5 लाख वाहनांची ये-जा होत असते. या प्रकल्पानंतर वाहनांना लागणाऱ्या वेळेत बचत होणार आहे. दीड तासांचा प्रवास 20-25 मिनिटांवर येणार आहे. 



हेही वाचा

सायन ब्रिजवरील वाहतूक जुलै 2026 पर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

दिंडोशी, गोरेगाव, विक्रोळी आणि अँटॉप हिलमधील 2000 घरांची म्हाडाची लॉटरी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा