Advertisement

ऐरोली-काटई विद्युत टॉवरचा मार्ग मोकळा

मुंबई मार्गे थेट डोंबिवली आणि कल्याणकडे जाणाऱ्या ऐरोली-काटई उन्नत मार्गाची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या माध्यमातून करण्यात येत आहे.

ऐरोली-काटई विद्युत टॉवरचा मार्ग मोकळा
SHARES

मुंबई (mumbai) मार्गे थेट डोंबिवली (dombivli) आणि कल्याणकडे (kalyan) जाणाऱ्या ऐरोली (airoli)-काटई (katai) उन्नत मार्गाची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (mmrda) च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

या कामात अडथळा असलेल्या ऐरोली पोस्ट कार्यालयाजवळील दुसऱ्या उच्च दाबाच्या मोनोपोलो विद्युत टॉवरचे (electric tower) काम पूर्ण झाल्याने आता पुलाच्या पुढील कामाला वेग येणार आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे ध्येय एमएमआरडीएने ठेवले आहे.

पहिल्या टप्यात ठाणे (thane) - बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 43.43 किमीचा मार्ग बनवणे आणि दुसरा टप्पा ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजलीपर्यंत जोड रस्ता बनविण्याचे नियोजन करण्यात आले.

कोरोनाच्या कालावधीत रखडलेले काम त्याच बरोबर सिडको, वनविभाग आणि सीआरझेडची परवानगी, रेल्वे ट्रॅकवर गर्डरसाठी परवानगी, वृक्षछाटणी परवाना, खाडी-पूल विभागाचा परवाना अशा अनेक प्राधिकृत परवान्यांची कसरत पूर्ण करत ऐरोली-कटाई उन्नत मार्ग अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे.

या ठिकाणी महावितरणच्या केबल वाहक विद्युत वाहिन्या जुनाट आणि कमी उंचीच्या असल्याने अडसर निर्माण झाला होता.

भविष्यात अवजड उंच वाहनांची वर्दळ सुरु झाल्यास होणारा त्रास आणि गर्डर टाकण्याकरीता उन्नत मार्गातील ऐरोली सेक्टर-3 पोस्ट कार्यालयाजवळ पालिकेच्या उद्यानातून गेलेल्या विद्याुत वाहिन्या काढून चार ठिकाणी नव्याने मोनोपोल विद्युत टॉवर उभारण्यात आले आहेत.

पहिल्या टप्प्यात 16 पीएससी आय गर्डर बसविण्यात आले आहेत. तर 15 दिवस वाहतूक व्यवस्थेत बदल करुन मोनोपोल टॉवर उभारला आहे.

त्यामुळे आता ऐरोली रेल्वे स्थानकानजीक गर्डर टाकल्यानंतर उन्नत मार्गातील अत्यंत महत्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.



हेही वाचा

कोल्डप्ले कार्यक्रमात लहान मुलांना प्रवेशबंदी

8.24 च्या एसी लोकल बाबत रेल्वे प्रशासन ठाम

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा