'उच्च जोखमीच्या' देशांतील सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी आधीच बुक करावी लागणार आहे. २० डिसेंबरपासून मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद इथल्या विमानतळांवर येणाऱ्यांना हा नियम लागू असेल. एएनआयनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.
मंगळवार, १४ डिसेंबर रोजी नागरी उड्डाण मंत्रालयानं त्यांच्या कार्यालयीन निवेदनात हे नमूद केलं आहे. एएनआयच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, २० डिसेंबरपासून, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद इथल्या विमानतळांवर 'जोखीम असलेल्या' देशांतील सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्यपणे प्रीबुक करावी लागेल.
Starting Dec 20th, all international travelers from 'at-risk' countries, arriving at airports in Delhi, Mumbai, Kolkata, Chennai, Bengaluru, and Hyderabad will have to compulsorily prebook an RT-PCR test.#Omicron pic.twitter.com/cnVxAuxy5T
— ANI (@ANI) December 14, 2021
याव्यतिरिक्त, हवाई सुविधा प्लॅटफॉर्ममध्ये, संबंधित विमानतळाच्या वेबसाइटची लिंक देखील प्रदान केली जाईल. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरताना त्या प्रवाश्यांना हे उपलब्ध असेल.
हवाई सुविधा पोर्टल "जोखीम असलेल्या" देशांतील प्रवाशांना किंवा गेल्या १४ दिवसांत "जोखमीच्या" देशांना भेट दिलेल्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्यपणे प्री-बुकिंग करण्यास सक्षम करेल. पहिल्या टप्प्यात भारतातील सहा मेट्रो शहरांमध्ये त्याची अंमलबजावणी होऊ शकते.
प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यासाठी, नवीन प्रणाली लागू होण्यासाठी आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे. हे २० डिसेंबरपासून (१९ डिसेंबर, रात्री ११.५९ पासून) कार्यान्वित होईल.
विमान कंपन्यांना प्रवाशांनी त्यांच्या फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी हे अनिवार्य प्री-बुकिंग तपासण्यास सांगितलं आहे. प्रवाशांना प्री-बुकिंगमध्ये समस्या आल्यास, त्यांना बुकिंग नाकारता येणार नाही. त्याऐवजी, एअरलाइन्सला विमानतळावरील चाचणीसाठी प्रवाशांना नोंदणी काउंटरवर घेऊन जावे लागेल.
हेही वाचा