Advertisement

दबावाला बळी न पडता बेकायदा बांधकामे पाडा - मुख्यमंत्री

मुंबई महापालिकेला मुंबईतील अनधिकृत बांधकामे युद्ध पातळीवर पाडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दबावाला बळी न पडता बेकायदा बांधकामे पाडा - मुख्यमंत्री
SHARES

मुंबई महापालिकेला मुंबईतील अनधिकृत बांधकामे युद्ध पातळीवर पाडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोणत्याही दबावाला बळी पडू नका. कोणताही दबाव सहन करू नका. दबाव झुगारून ही कारवाई करा. मी तुमच्या पाठीशी आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबईत अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत. प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिशय जागरूकपणे आणि कर्तव्यकठोरपणे यावर तातडीनं कारवाई करावी. कुणाचाही दबाव आला तरी सहन करू नका. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. मुंबईतील रस्ते दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीनं करा, कुणालाही बोट उचलण्याची संधी मिळाली नाही पाहिजे हे पाहा, असंही ते म्हणाले.

याशिवाय पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्या जातात असे निदर्शनास आलं आहे. याठिकाणी कॅमेरे लावून जे हे करीत असतील त्यांच्यावर तातडीनं कारवाई करा ज्याप्रमाणे आपण दररोजच्या स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय पथके नेमलेली असतात त्याप्रमाणे डेब्रिजसाठी देखील पथके नेमावीत. तसेच बांधकामाचा कचरा, दगड-विटा माती लगेचच्या लगेच कसा उचलता येईल हे पाहावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

आपल्याला शहर सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले करायचे आहे. त्यामुळे रस्ते, पदपथ, दुभाजक, रस्तयांच्या कडेचे कठडे, बागा-उद्याने सुंदर आणि व्यवस्थित असतील हे पाहण्याचे काम पूर्ण करा. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्यानं पूर्ण झालं पाहिजे, त्यासाठी कालमर्यादा ठरवून द्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी या कडक सूचना दिल्या आहेत. आजच्या आयोजित बैठकीस पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, सहायक आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाता तसंच टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते.



हेही वाचा

मुंबईतील पहिला सेफ स्कूल झोन तयार, अपघात रोखण्यासाठी फायदेशीर

Colleges Reopens : ...तर महाविद्यालयातच विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा