Advertisement

लोकलच्या महिला डब्यावर दगडफेक, एक प्रवासी जखमी

मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या महिला डब्याच्या दिशेनं एका अज्ञात व्यक्तीनं दगड मारल्यानं एक महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

लोकलच्या महिला डब्यावर दगडफेक, एक प्रवासी जखमी
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या महिला डब्याच्या दिशेनं एका अज्ञात व्यक्तीनं दगड मारल्यानं एक महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कांचन शेलार असं या जखमी महिलेचं नाव अाहे. कांचन या गुरुवारी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास सीएसएमटीच्या दिशेनं प्रवास करत होत्या. त्यावेळी सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान अज्ञात व्यक्तीनं महिला डब्यावर मारला आणि यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत.


प्रवाशांची प्रचंड गर्दी

मध्य रेल्वे मार्गावर सकाळच्या सुमारास प्रवाशांची मोठ्या प्रमाणात असते. तसंच, कांचन यांनी देखील सकाळी मोठ्या प्रामाणात गर्दी असल्यामुळं लोकलच्या दरवाजातच उभ्या होत्या. त्याशिवाय, बाकीच्या ३ महिला त्यांच्या बाजूलाच उभ्या होत्या. दरम्यान, लोकलनं सायन रेल्वे स्थानक सोडल्यानंतर अचानक महिला डब्याच्या दिशेनं दोन दगड मारण्यात आले.


दादर स्थानकात प्रथमोपचार

यावेळी एक दगड कांचन यांच्या डाव्या खांद्याला आणि दुसरा दगड गुडघ्याला लागला. यामध्ये जखमी झाल्या. त्यावेळी महिला डब्यातील इतर प्रवाशांनी त्यांना मदत केली. त्यानंतर या प्रकरणी कांचन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. दरम्यान, दादर रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्यांनी प्रथमोपचार घेतले.



हेही वाचा -

प्रदीप नांदराजोग रविवारी घेणार मुख्य न्यायाधीशपदाची शपथ

भाजपाच्या उमेदवार पूनम महाजन भरणार उमेदवारी अर्ज



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा