Advertisement

गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर कमी

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अद्याप सुरक्षेच्या दृष्टीनं महापलिका व राज्य सरकारनं मास्क घालणं बंधनकारक केलं आहे.

गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर कमी
SHARES

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अद्याप सुरक्षेच्या दृष्टीनं महापलिका व राज्य सरकारनं मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. मात्र, तरिही अनेकजण मास्क घालणं टाळत असून, सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन ही करत नाहीत. त्यामुळं नागरिकांना मास्क वापराबाबत शिस्त लागावी यासाठी महानगरपालिका विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईदेखील करत आहे. तरीही अनेक मुंबईकर घराबाहेर पडताना किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. 

अनेक जणांच्या चेहऱ्यावरचा मास्क हा अक्षरशः नाक आणि तोंडाच्या खाली सरकलेला असतो, तर काहीजण केवळ पोलिसांना व पालिकेच्या क्लिनअप कर्मचाऱ्यांना पाहिल्यावरच कारवाईच्या भीतीपोटी मास्क वापरतात. १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी वेळेच्या बंधनात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं रेल्वेस्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीत काही प्रमाणात वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. 

मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं अत्यंत गरजेचं झालं आहे. कोरोनाचा प्रकोप आता कमी झाला असला तरीदेखील मुंबईत दिवसाला सरासरी ४०० ते ५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. सकाळी उद्यानांमध्ये व्यायाम करण्यासाठी येणारे काही नागरिक मास्क वापरण्यास टाळाटाळ करतात, तर बाजार व खरेदीच्या ठिकाणांवर अनेक विक्रेते व दुकानदारदेखील मास्क वापरत नसल्याचे पाहायला मिळत आहे. 

मुंबईतील दाट लोकवस्ती असणाऱ्या भागांमध्ये नाक्यावर जमलेल्या निम्म्या तरुणांनी मास्क घातलेला नसतो, तर काहीजण मास्क नाक व तोंडाच्या खाली सरकवून एकमेकांशी बोलत उभे असतात. अनेक वाहनचालकदेखील मास्क वापरत नसल्याचे चित्र आहे. यामुळे लोकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी झाली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा