Advertisement

आग विझवणाऱ्या ड्रोनची अग्निशमन दलाला प्रतीक्षा


आग विझवणाऱ्या ड्रोनची अग्निशमन दलाला प्रतीक्षा
SHARES

मुंबई :मुंबई अग्निशमन दलात लवकरच आग विझवणारा रोबो दाखल होणार आहेपरंतु या फायर रोबोबरोबरच अग्निशमन दलाच्यावतीनं ड्रोनचीही खरेदी करणार आहे. परंतु आतापर्यंत छायाचित्रण करणारा आणि सर्वांवर लक्ष ठेवणारा ड्रोन उपलब्ध असला तरी प्रत्यक्षात आगीचा पाईप घेऊन आग विझवण्याची किमया साधणारा ड्रोन उपलब्ध होत नाही. त्यामुळे अग्निशमन दलाला आता आग विझवणाऱ्या ड्रोनची प्रतीक्षा असून त्यानंतरच या ड्रोनची खरेदी करण्यात येणार आहे.


अग्निशमनच्या मदतीस ड्रोन

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अग्निशमन दलात फायर रोबो आणि ड्रोनची खरेदी करून त्याच्या सहाय्यानं मदतकार्य राबवलं जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार फायर रोबोच्या खरेदीची प्रक्रिया सुरु असून त्याला स्थायी समितीनेही मान्यता दिली आहेपरंतु अद्यापही ड्रोनबाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीअग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसारड्रोन उडवायचा असेल तर स्थानिक पोलिसांसह विविध परवानग्या घ्याव्या लागतात. परंतु ड्रोनसाठी तेवढ्या सहजासहजी परवानगी मिळत नाहीसार्वजनिक ठिकाणी तर परवानगी मिळतही नाही.


पालिका ड्रोनच्या शोधात

ड्रोनच्या खरेदीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत पाहिलेल्या ड्रोनमध्ये गगनचुंबी इमारतींमध्ये उंचावर पाईप घेऊन उडेल, अशाप्रकारचा ड्रोन अस्तित्वात नाही. त्यामुळे अशाप्रकारचा ड्रोन उपलब्ध होईल, तेव्हा त्याच्या खरेदीचा विचार केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत आपण जो ड्रोन पाहिला त्यावर कॅमेरा बसवून गर्दींवर लक्ष ठेवणं किंवा क्रिकेट सामन्यात त्याचा वापर केला गेलाय. परंतु आग विझवण्यासाठी याचा वापर अद्याप झालेला नाही. त्यामुळे अशाच प्रकारच्या ड्रोनचा शोध घेतला जात असून तशाप्रकारचा ड्रोन आढळून आल्यास त्यांची खरेदी केली जाईल. जर अशाप्रकारचा ड्रोन मिळाल्यास उत्तुंग इमारतींमध्ये लागलेल्या आगींवर नियंत्रण मिळवणं सोपं जाईल, असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. 


ड्रोनचा वापर करावा

शिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांनी मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या सेवेत ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात यावा, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. जेणेकरून आपत्कालिन परिस्थितीत ड्रोन कॅमेराद्वारे पाहणी करून घटनेचे स्वरुप आणि स्थितीचा त्वरीत आढावा घेण्यास मदत होईल. त्यानुसार योग्य उपाययोजनांद्वरे कमी वेळेत आगीवर नियंत्रण मिळवता येईल, असं म्हटलं आहे.



हेही वाचा

Exclusive: सोसायट्यांनो सावधान! अग्निरोधक यंत्रणा नादुरूस्त असल्यास वीज-पाणी कापणार

मुंबईतील ९० टक्के इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा बिनकामाची?




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा