बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बोरिवली (पश्चिम) परिसरातील 'आर मध्य' आणि 'आर उत्तर' विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
विभाग परिसरातील ऑरा हॉटेल समोरील लिंक रोडच्या पूर्वेकडील बाजूस १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (वल्लभ नगर आउटलेट) वळवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. गुरुवार (५ मे) रात्री ११.५५ वाजल्यापासून शुक्रवार (६ मे) रात्री ११.५५ वाजेपर्यंत हे काम हाती घेण्यात येणार आहे.
या कालावधीत म्हणजेच गुरुवारी रात्री ११.५५ ते शुक्रवारी रात्री ११.५५ पर्यंत 'आर मध्य' आणि 'आर उत्तर' विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
आर मध्य विभाग
आर उत्तर विभाग
सर्व संबंधीत विभागातील नागरिकांना या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तसंच, कपातीच्या कालावधीत काटकसरीनं पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.
हेही वाचा