सध्या राज्यात महसूल विभागीय स्तरावर हवामान कार्यशाळा केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांद्वारे हवामानाशी संबंधित माहिती आणि अंदाज प्राप्त केला जातो. ही केंद्रे आता महसूल परिषद स्तरावरून गावपातळीवर नेण्यात येणार आहेत. मदत व पुनर्वसन विभाग तसेच कृषी विभाग आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 10 हजार गावांमध्ये हवामान केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी आज विधानसभेत दिली.
पीक विमा कायद्यानुसार, कंपनीला विमा मंजूर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना परतावा द्यावा लागतो. या कालावधीत नुकसान भरपाई न मिळाल्यास, ही रक्कम व्याजासह देण्यास कंपनी बांधील आहे. जळगाव (jalgao) जिल्ह्यात आंबिया बहार (ambiya bahar) 2022-23 मध्ये पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे 66 हजार 988 अर्ज भरपाईसाठी पात्र ठरले आहेत. 2022-23 मध्ये पीक विम्यासाठी 593 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
अंबिया बहार (ambiya bahar) 2022-23 मध्ये, राज्यातील शेतकऱ्यांनी 821 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला. संबंधित वर्षात शेतकऱ्यांना 123 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. जळगाव (jalgao) जिल्ह्यात या शेतकऱ्यांनी 821 कोटींपैकी 375 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. तर जळगाव (jalgao) जिल्ह्यात शेतकऱ्यांना 594 कोटी रुपये परतावा या वर्षात मिळाले आहेत.
हेही वाचा