Advertisement

पश्चिम रेल्वेवरील लोकलचा स्पीड वाढणार

प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील लोकलचा स्पीड वाढणार
SHARES

आता पश्चिम रेल्वेवरील लोकलचा वेग वाढणार आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

क्रॉसओव्हर पॉइंट म्हणजेच रेल्वे ट्रॅक बदलण्याच्या ठिकाणी लोकलचा वेग कमी ठेवावा लागतो. त्यामुळं वेळ जातो आणि परिणामी लोकल स्थानकात पोहोचण्यास उशीर होतो. हाच वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने क्रॉस ओव्हर पॉइंट्सवर थिक वेब स्विच बसवण्यास सुरुवात केली आहे.

सध्या 54 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर नव्या वर्षात उर्वरित काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या नव्या प्रकल्पामुळं लोकलचा वेग ताशी 50 किमीपर्यंत वाढणार आहे. त्यामुळं प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे. 

क्रॉस ओव्हर पॉइंटवर ट्रेन एका रुळावरुन दुसऱ्या रुळावर जाताना सुरक्षितेतासाठी वेग कमी ठेवावा लागतो. त्यामुळं वेळेचा अपव्यय होतो. मात्र या थिक वेब स्विच यंत्रणेमुळं लोकलचा वेग 50 किमीपर्यंत वाढेल. नवीन थिक वेब स्विच प्रणालीमुळं लोकल वेळेवर पोहोचण्यास मदत होणार आहे.

तसंच, प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. या प्रणालीमुळं ट्रॅक बदलताना भागांची झीज कमी होते. तसंच, देखभाल आणि दुरुस्तीची आवश्यकता कमी भासते. 

पश्चिम रेल्वे वाहतुकीत काय बदल?

शनिवारी मध्य रात्री १२:३० ते रविवारी पहाटे ४ - भाईंदर आणि वसई रोड स्थानकादरम्यान- काही गाड्या रद्द होतील. धिम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील



हेही वाचा

बेस्ट बस चालकांच्या प्रशिक्षणात ई-बसचा समावेश होणार

रे रोड केबल ब्रिज जानेवारी 2025 मध्ये खुला होणार?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा