मुंबईमध्ये आलिषान घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण गगनाला भीडलेल्या किंमती पाहिल्या की अनेकांची स्वप्न हवेतच विरतात. पण जर तुम्हाला सांगितले की, मुंबईत एका १५ वर्षांच्या मुलीने स्वत:च्या हिमतीवर घर घेतले आहे तर?
आश्चर्य चकित तर तुम्ही झाला असालच यात काही शंका नाही. पण फ्लॅशबॅकमध्ये जाऊन प्रत्येकजण १५ वर्षांचे असताना काय करत होता? हाच विचार करायला लागला असेल. त्या वयात तर बरेच जण शाळेत असतील. मग या १५ वर्षांच्या मुलीने कसे काय मुंबईसारख्या शहरात घर घेतले ते एकटीच्या जीवावर?
तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत तुमच्या आवडत्या रुही बद्दल... आता ही रुही कोण आणि असं काय करते जिने मुंबईत स्वत:च्या हिमतीवर घर घेतले. तर ही रुही आहे ये है मोहाबते या मालिकेतील बालकलाकार. रुहानिका धवन (Ruhaanika Dhawan) असे या अभिनेत्रीचे नाव आहे.
स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये है मोहब्बतें’ (Yeh Hai Mohabbatein) या मालिकेमुळे रुहानिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. रुहानिकाने या मालिकेमध्ये रुही ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल या मुख्य कलाकारांच्या जोडीसोबत तिनेही आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात स्थान मिळवले होते.
रुहानिका ही सोशल मीडियावर खुपच सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. रुहानिकाने नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये तिने नव्यानेच खरेदी केलेल्या घराची माहिती दिली आहे. या यशामागचे श्रेय तिने तिच्या आईला दिले आहे.
"वाहेगुरुजी आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे मी ही नवी सुरुवात करू शकले. माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठं स्वप्न मी पूर्ण केलेय. माझे हक्काचे घर मी विकत घेतलेय. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मला मिळालेल्या संधींमुळे मी हे स्वप्न पूर्ण करू शकले. अर्थात माझ्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाशिवाय हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसते," अशी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर केली आहे.
ती पुढे म्हणते, "माझ्या आईचा मी विशेष उल्लेख करते. ती जादूगार आहे. तिने पैसे वाचवले आणि ते पैसे तिने डबल केले. ती हे कसे करते हे फक्त देव आणि तिलाच माहीत. मी आता थांबणार नाही. ही फक्त सुरूवात आहे. मी मोठी स्वप्ने पाहत आहे, मी माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करेन. स्वप्न पहा, ते नक्कीच एक दिवस पूर्ण होईल."
रुहिच्या आयुष्याबद्दल या 11 गोष्टी
हेही वाचा