संपूर्ण महाराष्ट्रात २३ जूनपासून प्लास्टीक बंदी लागू केली आहे. याची अंमलबजावणीही जोरात सुरु झाली असून काहींना प्लास्टिक वापरासाठी दंडही आकारण्यात आला अाहे. सर्वच स्तरातून या बंदीला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. दक्षिण मुंबईतील 'आम्ही गिरगावकर' या तरुणांच्या संघटनेने गिरगावला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घेत रविवारी कापडी पिशव्यांचं वाटप केलं.
'आम्ही गिरगावकर' ही तरुणांची संघटना नेहमीच वेगवेगऴे उपक्रम राबवत असते. या माध्यमातून समाजात एक सकारात्मक बदल घडून अाणण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर असतात. मस्जिद बंदरजवळील मोहम्मद अली रोडवरुन एका व्यापाऱ्याकडून या कापडी पिशव्या घेऊन त्यावर छपाई करण्यात आली. अशा २००० पिशव्यांचे परिसरात मोफत वाटप करण्यात आले.
गिरगाव जंक्शन, ठाकुरद्वार, चिरा बाजार, ग्रॅंट रोड मार्केट, गिरगावातील अनेक चाळी, येथील दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांना या कापडी पिशव्या देण्यात आल्या.
प्लास्टिक बंदीच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. आम्ही पण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच भावनेतून गिरगावाला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप केलं.
- गाैरव सागवेकर, अध्यक्ष, आम्ही गिरगावकर
हेही वाचा -
२४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता