भारतीय क्रिकेटची शान असलेल्या विराट कोहलीचा मेणाचा पुतळा अाता मादाम तुसाँ संग्रहालयात सर्वांचे लक्ष वेधून घेत अाहे. दिमाखदारपणे फलंदाजीच्या शैलीत उभा असलेल्या विराट कोहलीच्या या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण अाज नवी दिल्लीतील मादाम तुसाँ संग्रहालयात करण्यात अाले. अाता या संग्रहालयात विराजमान असलेल्या डेव्हिड बेकहॅम, लिअोनेल मेस्सी, कपिल देव अाणि उसेन बोल्ट यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत विराट कोहलीनं स्थान मिळवलं अाहे.
हा पुतळा बनविण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची अाणि कामाची मी प्रशंसा करतो. एक संस्मरणीय अनुभव देण्यासाठी मादाम तुसाँने माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचा अाभारी अाहे. त्याचबरोबर माझ्या चाहत्यांचा अाणि त्यांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल मी त्यांचा ऋणी अाहे. हा अनुभव मी माझ्या अाठवणींच्या कुपीत जतन करून ठेवीन. अाता चाहत्यांच्या प्रतिक्रियांसाठी मी उत्सुक अाहे.
- विराट कोहली, भारतीय संघाचा कर्णधार
जवळपास २०० वेळा माेजमाप घेऊन विराट कोहलीच्या मेणाची कलाकृती सादर करण्यात अाली अाहे. भारतीय क्रिकेट संघाची वनडे जर्सी परिधान केलेला अाणि शाॅट लगावण्याच्या शैलीत असलेला हा पुतळा चाहत्यांना पाहायला मिळणार अाहे. या संग्रहालयात बाॅलिवूड, हाॅलिवूड, संगीतकार, राजकीय नेते यांसारख्या अनेक लोकप्रिय व्यक्तींचे पुतळे साकारण्यात अाले अाहेत.
Come 6th of June, let’s play statue! 😉 Excited to be at #MadameTussauds 😃#TussaudsDelhi@MadameTussauds@tussaudsdelhi pic.twitter.com/074c3lQF0o
— Virat Kohli (@imVkohli) June 5, 2018
हेही वाचा -