Advertisement

द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन

पेशाने सिव्हिल इंजिनीयर असलेले द्वारकानाथ संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर काम करत होते. मात्र क्रिकेटवर लिहिणं, बोलणं आणि मराठी साहित्यातली त्यांची रुची त्यामुळे त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडला.

द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन
SHARES

लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी (Dwarkanath Sanzgiri) यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात (lilavati hospital) अखेरचा श्वास घेतला.

पेशाने सिव्हिल इंजिनीयर असलेले द्वारकानाथ संझगिरी मुंबई (mumbai) महापालिकेत (bmc) उच्च पदावर काम करत होते. मात्र क्रिकेटवर लिहिणं, बोलणं आणि मराठी साहित्यातली त्यांची रुची त्यामुळे त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडला.

मराठी क्रिकेट (cricket) रसिकांनी त्यांच्या क्रिकेटवरच्या लेखांना आणि इतर लेखांना कायमच दाद दिली होती. क्रिकेट या खेळाबाबतची माहिती देणारा, त्यातली सौंदर्यस्थळं लेखणीने टिपणारा एक अवलिया माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे.

क्रिकेट विश्व, त्यावरच्या सुरसकथा लिहिणारी लेखणी शांत झाली आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्व हळहळलं आहे.

द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत काम केले, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते 2008 या वर्षी मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले.

त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. 1970 च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले.

भारताने इंग्लंडमध्ये 1983 चा विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते, ज्यासाठी द्वारकानाथ संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले.

द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983 पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप देखील कव्हर केले आहेत. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत.



हेही वाचा

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने...

गर्दी कमी करण्यासाठी पालिकेचे पार्किंग अ‍ॅप

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा