इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल)चा लिलाव नुकताच पार पडला असून अनेक खेळाडूंची आदला-बदल झाली आहे. संघ मालकांनी खेळाडूंवर बोली लावत चांगल्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलं आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स याला सर्वाधिक १५ कोटी ५० लाखांच्या बोलीसह कोलकाता संघाने खरेदी केले. तो यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. अशातच आयपीएलच्या २०२० च्या सुरूवातीची तारीखही समोर आली आहे.
IPL 2020 ची सुरुवात येत्या २९ मार्चपासून होणार आहे. या हंगामातील सलामीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स टीम आपल्या घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, याबाबत IPL कडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
IPL 2020 ची सुरुवात २९ मार्चला मुंबई येथून होणार आहे. परंतु, यावेळी आयपीएलच्या प्रथम काही सामन्यांमधअये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंचा समावेश होऊ शकणार नाही. या काळात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी २० मालिका असणार आहे. तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार असून, ही मालिका ३१ मार्चला संपणार आहे.
हेही वाचा -
New Year: नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीसही सज्ज
राज्यपाल के. सी.पाडवींवर संतापले, पुन्हा घ्यायला लावली शपथ