इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या पर्वाच्या लिलावाआधी बुधवारी सर्वच संघांना आपले राखून ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर करण्यात आली. तसंच, राजस्थान रॉयल्सनं अधिकृतरित्या स्मिथला रिलीज केल्याची घोषणा केली. शिवाय, संघाचा कर्णधाराची घोषणा करत संघाचा कर्णधार कोण असेल या प्रश्ना उत्तर दिलं आहे.
A new chapter begins now. 🚨
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 20, 2021
Say hello to your Royals captain. #SkipperSanju | #HallaBol | #IPL2021 | #IPLRetention | @IamSanjuSamson pic.twitter.com/pukyEiyb1B
राजस्थानच्या संघाची जबाबदारी युवा खेळाडू संजू सॅमसन याच्यावर असणार आहे. राजस्थानने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे स्पष्ट केलं आहे. राजस्थान संघ व्यवस्थापनानं स्टीव्ह स्मिथला करारमुक्त करण्याचा निर्णय खूप चर्चा करून घेतला. स्मिथने २०१४,२०१५, २०१९ आणि २०२० च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं.
राजस्थान रॉयल्सनं नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरवला पाहिजे असं आकाश चोप्रा याने सल्ला दिला होता. मागील पर्वामध्ये स्मिथचं नेतृत्व अपेक्षेपेक्षा खूपच वाईट ठरलं होतं त्यामुळे बदलाची अपेक्षा आहे असं तो म्हणाला होता. त्याचा अंदाज खरा ठरला.