अातापर्यंत खेळण्यात आलेल्या अायपीएलच्या १० पैकी १० सिझनच्या उद्घाटन सोहळ्याला सर्व संघांचे कर्णधार उपस्थित राहिले आहेत. पण पहिल्यांदाच ७ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला फक्त मुंबई इंडियन्स अाणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे कर्णधार वगळता अन्य ६ संघांचे कर्णधार उपस्थित राहणार नाहीत. अाठही संघांचे कर्णधार ६ एप्रिलला होणाऱ्या स्पेशल व्हिडियो शूटसाठी उपस्थित राहणार असून त्यानंतर ते अापापल्या सामन्यासाठी रवाना होतील.
प्रोटोकाॅलनुसार, गेल्या वर्षीपर्यंत सर्व संघ उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून 'स्पिरिट अाॅफ प्लेज' ची शपथ घ्यायचे. मात्र यावर्षी उद्धाटन सोहळ्याअाधी मुंबईत ७ एप्रिलला अायपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होईल. त्यानंतर मुंबई इंडियन्स अाणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना खेळवण्यात येईल.
पुढील दिवशी ४ संघांना सामना खेळण्यासाठी मैदानात उतरायचे असल्यामुळे या प्रोटोकाॅलमध्ये बदल करण्यात अाला अाहे. ८ एप्रिलला दिल्ली डेअरडेव्हिल्स अाणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात मोहाली इथं तर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू अाणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात कोलकाता इथं सामना होणार अाहे.
सामन्यासाठी प्रत्येक संघाला अापला गृहपाठ करावाच लागतो. जर गौतम गंभीर अाणि रवीचंद्रन अश्विन यांना उद्घाटन सोहळ्याला निमंत्रित केलं तर त्यांचा गृहपाठ होणार नाही. शिवाय त्यांना मुंबईहून दिल्लीला किंवा चंडीगढला जाण्यासाठी रात्री विमान पकडणं शक्य होणार नाही. त्याचबरोबर दिल्लीहून चंडीगढला जाण्यासाठी रविवारी विमान मिळणार नाही. त्यामुळे रात्री कारने प्रवास करावा लागेल, हे धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळेच अाम्ही उद्घाटन सोहळ्याला कर्णधारांना निमंत्रित करण्याचा विचार केला नाही.
काही समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे अाम्ही उद्घाटन सोहळ्याला कर्णधारांना बोलावणे टाळलं. यावर मात्र अाम्ही वेगळाच तोडगा काढला अाहे. अाता कर्णधारांना उद्घाटनाच्या अादल्या दिवशी बोलावलं जाईल, त्यांचा व्हिडियो चित्रित केला जाईल अाणि उद्घाटन सोहळ्याप्रसंगी तो दाखवला जाईल.
- सी. के. खन्ना, बीसीसीअायचे हंगामी अध्यक्ष
हेही वाचा-
'आयपीएल' दिसणार आता 'स्टार'वर, १६,३४७ कोटी रुपयांना विकत घेतले प्रक्षेपण हक्क