Advertisement

एमएमपीएलमध्ये जुहू हिरोजची विजयाची हॅटट्रिक


एमएमपीएलमध्ये जुहू हिरोजची विजयाची हॅटट्रिक
SHARES

साई-मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीग स्पर्धेत जुहू हिरोज संघाने अापली विजयी परंपरा कायम राखली अाहे. मरीन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखान्यावर रविवारी रंगलेल्या पहिल्या सामन्यात जुहू हिरोजने मुलुंड मास्टर ब्लास्टर संघाचे अाव्हान सहज परतवून लावत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. यासह जुहू हिरोजने ब गटात अव्वल स्थान पटकावले अाहे. जुहू हिरोजच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो प्रतिक पाटील. सलग तिसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या प्रतिक पाटीलने पुन्हा एकदा ६७ धावांची अप्रतिम खेळी साकारत जुहू हिरोजच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.


मुलुंड संघाच्या २ बाद १३३ धावा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुलुंड मास्टरब्लास्टरला चांगली कामगिरी करता अाली नाही. अनुज माथूर याने अफलातून फलंदाजी करत ३२ चेंडूंत ७ चौकार अाणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्यामुळे मुलुंड संघाला १८ षटकांत २ बाद १३३ धावा करता अाल्या. मार्झूक सय्यद (१९), विवेक प्रभू (२३) अाणि सिद्धार्थ नाईक (नाबाद २४) यांनीही मोलाचे योगदान दिले.


प्रतिक पाटील पुन्हा ठरला हिरो

१३४ धावांचे लक्ष्य गाठताना तेजस सोलंकी अाणि प्रतिक पाटील यांनी जुहू हिरोजला दमदार सुरुवात करून दिली. तेजसने ३३ धावांची खेळी केली. तर प्रतिक पाटीलने अखेरपर्यंत किल्ला लढवत अापल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने ५९ चेंडूंचा सामना करत ११ चौकारांसह ६७ धावा फटकावल्या. त्यामुळे जुहू संघाने १ विकेट्सच्या मोबदल्यात सहज विजय साकारला.


हेही वाचा - 

शिवाजी पार्क सुपरस्टार्सला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा