मास्टर ब्लास्टर (Master Blaster) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) लवकरच ऑस्ट्रेलिया (Australia) संघाचा प्रशिक्षक (Team Coach) होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू रिकी पॉटिंग (Ricky Ponting) आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांनी आयोजित केलेल्या बुशफायर क्रिकेट लीग (Bushfire Cricket Bash) मॅचसाठी सचिन कोच होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू रिकी पॉटिंग आणि शेन वॉर्न यांनी आगीत होरपळलेल्या ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी एका क्रिकेट स्पर्धेचं (Cricket Match) आयोजन केलं आहे.
ऑस्ट्रेलियातील 'अॅमेजॉन' जंगलामध्ये (Amazon Forest) भिषण आग लागली होती. या आगीत जवळपास ४८ कोटी प्राणी (Animals) आणि पक्षी (Birds) यांना जीव गमावावा लागला. तसंच, न्यू साऊथ वेल्स (New South Wales) या राज्याला या वणव्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. त्याचप्रमाणं, ऑस्ट्रेलियातील खुरट्या जंगलांमध्ये लागलेल्या आगींचं विक्राळ वणवे बनले असून, व्हिक्टोरिया (Victoria) आणि न्यू साऊथ वेल्स (New South Wales) या राज्यांमध्ये या वणव्यांनी हाहाकार उडवून दिला आहे. त्यामुळं ‘बुशफायर’ (Bushfire) असं या वणव्यांचं नामकरण करण्यात आलं आहे.
या आगीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू रिकी पॉटिंग आणि शेन वॉर्न यांनी आगीत होरपळलेल्या ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी 'बुशफायर क्रिकेट बॅश' (Bushfire Cricket Bash) या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेच्या तिकीटातून (Tickets) जमा होणाऱ्या पैशातून ऑस्ट्रेलियातील आगीमध्ये नुकसान झालेल्या घरांच्या पुर्नवसनासाठी मदत केली जाणार आहे.
Cricket Australia: Indian legend Sachin Tendulkar and West Indies great Courtney Walsh will coach the Ponting XI and Warne XI respectively in the Bushfire Cricket Bash on Saturday, February 8. (file pics) pic.twitter.com/TfAJLAFRaY
— ANI (@ANI) January 21, 2020
ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे (West Indies) कॉर्टिनी वॉल्श (Courtney walls) यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. या 'बुशफायर क्रिकेट बॅश' स्पर्धेमध्ये सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे कॉर्टिनी वॉल्श हे पॉंटिंग (Ponting) आणि वॉर्न (Warne) संघाचे कोच असणार आहेत. 'बुशफायर क्रिकेट लीग' ही स्पर्धा ८ फेब्रुवारी रोजी खेळवली जाणार आहे.
मागील ४ महिन्यांपासून ही आग धगधगत असून, या आगीनं आतापर्यंत ४८ कोटींहून अधिक प्राण्यांचा जीव घेतला आहे. अखेर अचानक पडलेल्या पावसामुळं ही आग नियंत्रणात आली. मात्र, ऑस्ट्रेलियातील जीवन पुर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदतीची हाक दिली जात आहे. दरम्यान, या मदतकार्यासाठी आता क्रिकेटपटू पुढे आले आहे. याआधी शेन वॉर्ननं आपल्या आवडत्या टोपीचा लिलाव केला होता.
हेही वाचा -
'झुंड नही टीम कहिए', बिग बींचा दमदार टीझर प्रदर्शित
लाच घेतल्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्याला अटक