इंडियन प्रिमीअर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामाचा लिलाव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ डिसेंबर रोजी पहिल्यांदाच कोलकाता शहरात हा लिलाव पार पडणार आहे. आगामी हंगामासाठी सुरू असलेली Player Transfer Window आता बंद झाली आहे. तसंच, एकूण ९७१ खेळाडूंनी या लिलावात सहभाग घेतला आहे.
गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडे आगामी हंगामासाठीच्या लिलावाकरता केवळ १३.०५ कोटी रुपयेच शिल्लक राहिलेले आहेत. आगामी हंगामाच्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सनं युवराज सिंह, बेन कटींग, एविन लुईस, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन सह आणखी काही खेळाडूंना करारमुक्त केलं आहे.
मुंबई इंडियन्स युवराजला करारमुक्त केलं असल्यानं मधल्या फळीतील खेडाळूची कमी संघाला भासणार आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सनं RCB चा फलंदाज मिलींद कुमारला सरावाकरता बोलावलं असल्याची माहिती मिळते. मिलींदनं आयपीएलमध्ये बंगळुरु आणि दिल्ली संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र, आतापर्यंत एकाही सामन्यात त्याला संधी मिळालेली नाही.
मिलींद कुमारनं रणजी क्रिकेटमध्ये केलेल्या आश्वासक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सच्या प्रशासनानं त्याच्यावर बोली लावण्याचा विचार केला आहे. युवराज सिंहला करारमुक्त केल्यानं मुंबई इंडियन्स मधल्या फळीत एका आश्वासक फलंदाजाच्या शोधात असणार आहे. मुंबईच्या संघात इशान किशन हा यष्टीरक्षक-फलंदाज असला तरीही त्याच्या खेळात सातत्य नाही आहे. त्यामुळं आगामी हंगामात मुंबईचा संघ मिलींद कुमारला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
चेेंबूरमध्ये बहिणीने केली भावाची हत्या
रेल्वे स्थानकांवरील वॉटर व्हेंडिंग मशीन बंद