इंडियन प्रीमियर लीगनंतर लगेचच टी-२० विश्वचषक होणार आहे. या टी-२० विश्वचषकासाठी भारतानं आपल्या नवीन जर्सीचे अनावरण केलं आहे. याबाबत बीसीसीआयनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. हा फोटो शेअर करत 'बिलियन चीयर्स जर्सी सादर करत आहे. जर्सीचा नमुना टीम इंडियाच्या चाहत्यांनी प्रेरित केला आहे. या जर्सीचा रंग गडद निळा आहे', असं लिहिलं आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा जर्सीसोबतचा फोटो बीसीसीआयनं ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत 'जर्सीचा नमुना चाहत्यांच्या कोट्यवधी प्रोत्साहनाने प्रेरित आहे', असं लिहिलं आहे. भारतानं आयोजित केलेला हा टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे.
Presenting the Billion Cheers Jersey!
— BCCI (@BCCI) October 13, 2021
The patterns on the jersey are inspired by the billion cheers of the fans.
Get ready to #ShowYourGame @mpl_sport.
Buy your jersey now on https://t.co/u3GYA2wIg1#MPLSports #BillionCheersJersey pic.twitter.com/XWbZhgjBd2
भारतीय खेळाडूंचा नव्या जर्सीसोबतचा फोटो व्हायरल होताच, त्यात असलेला रोहित शर्मा जास्त चर्चेत आला आहे. त्याची एक कृती कौतुकास्पद ठरली आहे. फोटोंमधील विराट, जडेजास बुमराहनं आपले बोट बीसीसीआयच्या लोगोकडे तर रोहितने आपले बोट INDIA या शब्दाकडे दाखवले.
टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात २४ ऑक्टोबर रोजी दुबईत पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यानं करणार आहे. यानंतर, भारताचा सामना ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होईल. त्याच वेळी, ३ नोव्हेंबर रोजी, अबुधाबीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध त्याचा तिसरा सामना असेल.
भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर.
मार्गदर्शक: महेंद्रसिंह धोनी